Rohan Magdum 🇮🇳

Rohan Magdum 🇮🇳

18-11-2022

15:43

नमस्कार मित्रांनो...! ( Part 1 ) काही वेळेस तुम्हाला असा अनुभव आला असेल की खूप तयारी करून पण तुम्हाला नेहमी इंटरव्ह्यू दिल्यानंतर रीजेक्शनला सामोरे जाव लागत आहे. सो इंटरव्ह्यू मधे अशा कोणत्या चुका नेहमी कॅण्डीडेट करतात याबद्दल मी आज थ्रेड आपल्या समोर मांडत आहे. 👇

भरपूर वेळेस काही सिंपल अशा चुका कॅण्डीडेट इंटरव्ह्यूमध्ये करत असतो, त्या चुका खालीलप्रमाणे आहेत, ज्या चुका तुम्ही टाळलात तर नक्कीच इंटरव्ह्यू क्लिअर होण्याची शक्यता वाढेल.

1 'Introduce Yourself' या प्रश्नाचा व्यवस्थित उत्तर न देणे. जेव्हा एकाधा फ्रेशर कॅण्डीडेट इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा अल्मोस्ट प्रत्येक वेळेस पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे introduce yourself..

आपल्याला एक समज असतो मनात की मला माझ्यापेक्षा चांगल कोण ओळखत. एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आतापर्यंत चे जे काही शिक्षण झालं असेल 14 15 वर्षांमध्ये या सगळ्या करीअर मधील महत्वाचे अचीवेमेंट्स तुम्हाला 3 ते 5 मिनिट्स मांडायचे असतात. सो या प्रश्नांची एकदम व्यवस्थित तयारी करा.

2. Not Providing 'Proof of Work' रिझुम मध्ये खूप सारे प्रोजेक्ट मेंशन केलेले असतात पण या सगळ्याचा प्रूफ ऑफ वर्क प्रोव्हाइड करणे फार गरजेचे आहे. प्रूफ ऑफ वर्क म्हणून तुम्ही लिंकडइन प्रोफाइल लिंक किंवा गिट-हब अकाउंट ची लिंक,या स्वरूपात पण प्रोव्हाइड करू शकता.

3. Not providing appropriate Real life Examples. जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट बद्दल विचारलं जातं तेव्हा तुमच्याकडून हे अपेक्षित असतं की तुमचा त्या प्रोजेक्टमध्ये नेमका काय रोल होता.

मोस्ट ऑफ स्टुडंट्स इंटरव्यू देताना फक्त प्रोजेक्टचा एंड रिझल्ट सांगतात.पण येथे हे अपेक्षित असतं की तुम्ही नेमका रोल काय प्ले केला होतात. कोणताही मोठा प्रोजेक्ट हा टीम वर्कचा पार्ट असतो त्यामुळे इंटरव्यूवरला हे अपेक्षित असतं की त्या प्रोजेक्टमध्ये नेमकं तुम्ही काय वर्क केला होता

तसेच इंटरव्यूमध्ये कोणत्याही प्रश्नाला उत्तर देताना योग्य असे उदाहरण दिलात तर तुमची टेक्निकल स्किल्स त्याचप्रमाणे तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट दिसून येते. सो,या सगळ्या कारणामुळे इंटरव्यूमध्ये योग्य असे उदाहरण देणे खूप गरजेचे आहे.

4)ot Asking Proper Questions to Interviewer. जेव्हा इंटरव्यू मध्ये तुम्हाला असं विचारलं जातं की तुम्हाला काही क्वेश्चन प्रश्न आहेत का? तेव्हा हे अपेक्षित असतं की तुम्ही योग्य असे प्रश्न विचारला. इंटरव्यू ला जाण्यापूर्वी तुम्ही ज्या कंपनीच्या इंटरव्यू ला जात आहात त्या

कंपनीची वेबसाईट तसेच बाकी महत्त्वाचे डिटेल्स वाचून जाणे खूप गरजेचे आहे सो दॅट तुम्ही इंटरव्यू मध्ये या संबंधित प्रश्न विचारू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की आपल्या कंपनीमध्ये सध्या कोणते मेजर प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत ज्यावर वर्क करणे गरजेचे आहे?

या काही चुका इंटरव्यू मध्ये आपण टाळल्या तर नक्कीच तुमचा इंटरव्यू हा सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. पार्ट २ मध्ये आणखीन काही पॉईंट्स मी कव्हर करेन.

जर हा थ्रेड हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेर करा अशाच आणखीन थ्रेडस साठी @RohanMagdum7 या ट्विटर हँडल ला follow करा. तुमच्या इंटरव्ह्यू साठी शुभेच्या...धन्यवाद…!


Follow us on Twitter

to be informed of the latest developments and updates!


You can easily use to @tivitikothread bot for create more readable thread!
Donate 💲

You can keep this app free of charge by supporting 😊

for server charges...