Rohan Magdum 🇮🇳

Rohan Magdum 🇮🇳

20-11-2022

13:30

नमस्कार मित्रांनो...!!! तुम्हाला असा अनुभव आला असेल की भरपूर जॉब ओपनिंगला अप्लाय करताना तुम्ही रिझ्युम तर सबमिट करता. पण खूप कमी वेळा तुमचा रिझ्युमे हा रिक्रुटर पर्यंत पोहोचला जातो. तर नेमके का असे होते हे आपण आजच्या थ्रेडमध्ये पाहू. ( भाग 1) 👇

तर मित्रांनो याचे उत्तर आहे 'ATS'. ATS म्हणजे नेमके काय? याचा वापर कशा पद्धतीने केला जातो? आणि पुढच्या वेळेस रिझुमे सबमिट करताना आपणही याची काळजी कशी घ्यायला हवी? हे आपण आता पाहू.

तर मित्रांनो ATS चा लॉंग फॉर्म आहे Applicant Tracking System. ATS हे एक सॉफ्टवेअर असून हे निश्चित करते की जॉब साठी अप्लाय करणारा कॅंडिडेट योग्य आहे की नाही (रिझ्युमच्या बेसिसवर)

तुमचा रिझ्युम प्रॉपर आहे की नाही हे निश्चित करण्याचं काम ATS करते. जर तुमचा रिझ्युमे व्यवस्थित असेल तर तो रिक्रुटर कडे फॉरवर्ड केला जातो. परंतु तुमचा रेसुमे जर व्यवस्थित नसेल म्हणजेच ATS फ्रेंडली नसेल तर तुमचा रिझ्युमे ATS कडून रिजेक्ट केला जातो.

तुम्हाला कधी कधीअसे वाटेल की माझ्याकडे तर इतके स्किल्स आहेत..! माझं शिक्षण तर इतकं झालं आहे...! मला इतका इंडस्ट्रियल अनुभव आहे...! किंवा मी इतके सारे सर्टिफिकेशन्स केलो आहे..! मी कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट होतो...! सो न सो....

तरीपण का मला रिझुम सबमिट केल्यावर रिक्रुट कडून कॉल बॅक किंवा ई-मेल येत नाही...? याचं एकदम सोपं उत्तर आहे ते म्हणजे तुमचा रिझ्युम एटीएस फ्रेंडली नाही.

ATS नेमके कसे वर्क करते? तर मित्रांनो ATS तुमच्या रिझुमे मधील माहिती, कीवर्ड्स त्याचप्रमाणे वेगवेगळे पॅरामीटर्स जॉब प्रोफाइल सोबत मॅच होते की नाही हे चेक करते आणि या प्रोसेस नंतर जे रिझ्युमे जॉब प्रोफाइल सोबत मॅच होतील ते फक्त रिक्रुटर कडे पोहोचतात.

तर मित्रांनो तुम्हाला जर ATS फ्रेंडली रिझ्युमे नेमका कसा बनवायचा, तसेच काही एटीएस फ्रेंडली रिझल्ट रिझुमे सॅम्पल्स हवे असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा. लवकरच मी तुम्हाला याबद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन करेल.

जर हा थ्रेड हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेर करा. अशाच आणखीन थ्रेडस साठी @RohanMagdum7 या ट्विटर हँडल ला follow करा. तुमच्या इंटरव्ह्यू साठी शुभेच्या...धन्यवाद…!


Follow us on Twitter

to be informed of the latest developments and updates!


You can easily use to @tivitikothread bot for create more readable thread!
Donate 💲

You can keep this app free of charge by supporting 😊

for server charges...